By  
on  

"Lockdown मध्ये ज्या तेलात वडे सोडले ...तेच तेल...."

अमेय वाघ आणि त्याच्या भन्नाट पोस्ट यांचं एक वेगळंच समिकरण आहे. लॉकडाऊनमध्ये तर त्याची सोशल मिडीयावर अफाट कल्पनाशक्ती पाहायला मिळाली. त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या या भन्नाट पोस्टचे असंख्य चाहते आहेत. 

अमेयने नुकतीच लॉकडाऊंनतर पुन्हा जोमाने कामाला लागण्यासाठी एक प्रेरणादायी पोस्ट केली आहे. पण तीसुध्दा त्याच्या भन्नाट स्टाईलने. अमेय म्हणतो, Lockdown मध्ये ज्या तेलात वडे सोडले ...तेच तेल डोळ्यात घालून काम करायची वेळ आलीये! उठा....काम करा !

नेहमीच्या त्याच्या मिश्कील शैलीत अमेयने कामाला सुरुवात करा असं सांगितल्याने एकच हशा पिकलाय.   त्याच्या या पोस्टवर नेटिझन्सनी अनेक भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive