By  
on  

प्राजक्ता माळीचा हा स्वॅग पाहिलात का, सई ताम्हणकरकडून शिकलीय ही गोष्ट

मराठी सिनेसृष्टीतील गोड अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असते. विविध पोस्टच्या माध्यमांतून प्राजक्ता चाहत्यांच्या रोज संपर्कात असते. नुकतेच प्राजक्ताने तिचे  काही स्वॅग मूडमधले फोटो पोस्ट केले आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी प्राजक्ता नेहमीच रंगतदार पार पाडते. 

या शोची एॅंकर म्हणून प्राजक्ताला विविध गेटअपमध्ये पाहणं म्हणजे चाहत्यांसाठी एक छान ट्रीटच असते. पण शोसाठी झक्कास तयार झाल्यावर आपल्या फोटोंचं खास श्रेय प्राजक्ताने आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरला दिलं आहे. 

 

 

आपल्या विविध पोझेसमधील फोटोंचं श्रेय सई ताम्हणकरला प्राजक्ताने दिलं आहे. सई या शोची परिक्षक आहे. त्यामुळे  सईकडून पोझसाठी विविध टीप्स मिळत असल्याचं प्राजक्ता सांगते. 

या कार्यक्रमात अभिनेत्री प्राजक्ता विविध ड्रेसेस आणि लुक्समध्ये पाहायला मिळते आणि सोशल मिडीयावर तिचे फोटो प्रचंड व्हायरल होतात. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive