By  
on  

सई ताम्हणकरचा हा मराठमोळा साज पाहिलात का?

मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस आणि आघाडीची अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर हे नाव सर्वप्रथम घेतलं जातं. मराठी सिनेसृष्टीतली ‘वर्कहोलिक’ म्हणून ओळखली जाणारी सई ताम्हणकरने  लॉकडाऊननंतर चित्रीकरणाला सुरूवात केली. सई तिच्या रिएलिटी सेटवर तब्बल तीन महिन्यांनी पुन:श्च हरिओम करताना खुपच उत्साही होती. या विविध  शोच्या निमित्ताने तिचे विविध लुक्स पाहायला मिळतायत. 

 

नेहमीच वेस्टर्न अंदाजात दिसणारी सई यावेळेस पारंपारिक मराठमोळ्या वेशभूषेत पाहायला मिळाली. महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी रिएलिटी शोच्या परिक्षकपदी सई विराजमान आहे. या शोच्या गणपती विशेष भागासाठी बहुधा सईने हा मराठमोळा साज केल्याचा अंदाज बांधता येतोय. पारंपारिक ब्राम्हणी पध्दतीची नऊवारी साडी सईने नेसली आहे आणि त्यावर सईने केलेला साजश्रृंगार यामुळे तिचं सौंदर्य खुलून दिसतंय. 

चाहत्यांनी सईच्या या घायाळ करणा-या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव सुरु केला आहे. आत्तापर्यंत तिच्या फोटोंना ४४ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. फक्त चाहतेच नाही तर सेलिब्रिटींनासुध्दा हा फोटो खुप आवडला आहे. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive