By  
on  

‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेत जिजाऊ साकारणा-या अमृता पवारला करोनाची लागण

 कुटूंबाच्या पलीकडे जाऊन रयतेचा विचार करणाऱ्या जिजाऊंनी उपेक्षित, वंचित, शोषित जनतेचा प्राधान्याने विचार केला. आपल्या जहागीरदारीचा विचार न करता प्रजेला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका कायम ठेवणा-या या स्वराज्यजननीचा अतुलनीय  प्रवास ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेतून  प्रेक्षकांसमोर उलगडतोय. गेल्यावर्षी ही मालिका रसिकांच्या भेटीला आली. या मालिकेत जिजाऊंची भूमिका साकारणा-या अभिनेत्री अमृता पवारला करोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. 

लॉकडाऊननंतर सर्वात आधी पुन्हा शूटींगचा श्रीगणेशा करणा-या मालिकांपैकी ‘स्वराज्यजननी जिजामाता’ ही मालिका एक आहे. करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर याविषयी अमृताने एका आघाडीच्या इंग्रजी दैनिकाला मुलाखत दिली. ती म्हणते, "मला सर्दी झाली होती. खबरदारीचा उपाय म्हणून मी आधी करोनाची चाचणी केली. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मी मालिकेच्या टीमला सविस्तर कळवलं. माझ्यानंतर सेटवरील इतरांनीही करोनाची चाचणी केली आणि सुदैवाने सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.”

अमृता सध्या घरीच क्वारंटाइन असून डॉक्टरांच्या सल्याने उपचार घेतेय. 

तसंच आता ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेत मोठा लीप घेण्यात आला आहे. प्रसिध्द अभिनेत्री भार्गवी चिरमुले ही आता या मालिकेत जिजाऊंची भूमिका साकरणार आहे.  तर शहाजी राजांची भूमिका शंतनू मोघे  साकारतील तर शिवबांच्या भूमिकेत बालकलाकार दिवेश मेडगे पाहायला मिळेल. नुकतेच मालिकेचे नवे प्रोमो झळकू लागले आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive