By  
on  

या दिवशी होणार सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचं लग्न

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर हे मराठी मनोरंजन विश्वातील सुंदर ऑफस्क्रिन कपल आहे. सोशल मिडीयावरही या कपलची चर्चा होत असते. आणि दोघं लवकरच लग्नबंधनातही अडकणार आहेत.  पिपींगमून मराठीने काही महिन्यांपूर्वी दिलेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीत सिद्धार्थ-मितालीच्या लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचं सांगीतलं होतं. मात्र आता दोघं कधी लग्न करणार हे समोर आलं आहे.

एका प्रसिद्ध वृत्तपत्राला मितालीने दिलेल्या मुलाखतीनुसार दोघं पुढल्या वर्षी म्हणजेच 2021मध्ये लग्न करणार असल्याचं वृत्त आहे. मागली वर्षी दोघांचा साखरपुडा मोठ्या थाटात पार पडला होता. या वर्षी दोघं लग्नबंधनात अडकणार होते. मात्र कोरोनाग्रस्त परिस्थितीत लग्न सोहळा थाटात करता येत नसल्याने दोघांनी लग्न पुढे ढकललं. 

मितालीने या प्रसिद्ध वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ती सांगते की, "सिद्धार्थ आणि मला आमचं लग्न ग्रँड असावं असं नेहमीच वाटायचं. आमचे मित्र-मंडळी, परिवारने आमच्या लग्नात यावं अशी आमची इच्छा आहे.सध्याच्या परिस्थितीत हे शक्य नाही.आणि आता आम्हाला 2020 या वर्षी लग्न करायचं नाही. तेव्हा पुढील वर्षी परिस्थितीत व्यवस्थित झाल्यावर आम्ही लग्न करू."

तेव्हा पुढील वर्षी म्हणजेच 2021  परिस्थितीत व्यवस्थित झाल्यावर सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर हे कपल लग्नबंधनात अडकणार आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive