By  
on  

Video : मिथीलाने गायलं हे गाणं, चाहते म्हणतात 'समजत नाहीय पण छान वाटतंय'

वेब क्वीन आणि सिनेअभिनेत्री म्हणून अल्पावधीतच इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण करणारी  मिथीला पालकर ही नेहमीच सोशल मिडीयावर चर्चेत असते. अनेकदा ती तिच्या वेगवेगळ्या लूक्समधील फोटो चाहत्यांशी शेअर करत असते तर कधी नानाविविध व्हिडीओ अपलोड करते. 

आपल्या कप सॉंगमुळे सोशल मीडियात  आणि त्यानंतर ‘मुरांबा’ सिनेमामुळे मराठी रसिक प्रेक्षकांच्या घराघरांत पोहचली. मिथीलाचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्यासाठी ती नेहमीच काही ना काही खास घेऊन येते. आतासुध्दा मिथीला दर शनिवारी #SingSongSaturday साजरा करते आणि दर आठवड्याला चाहत्यांसमोर एक गाणं सादर करते.

आजच्या शनिवारी मिथीलाने चक्क तमिळ गाणं गाऊन चाहत्यांना सरप्राईज केलं आहे. चाहत्यांनासुध्दा  अर्थ कळत नसला तरी तिच्या गोड आवाजात सजलेलं हे गाणं ते प्रचंड एन्जॉय करतायत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Snehithane #SingSongSaturday

A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial) on

 

मिथीला पालकरच्या आवाजात हे गाणं ऐकायला फारच छान वाटतं. आत्तापर्यंत 31 हजारांहून अधिक लोकांनी मिथीलाच्या या  स्वरांना लाईक्समधून पसंतीची पावती दिली आहे. 

यापूर्वी मिथीलाने  माझे राणी, माझे मोगा तुजे डोळ्यात सोधता ठाव. माझे राणी माझे मोगा...... हे कोकणी भाषेतलं गाणं  गायलं होतं. त्यालासुध्दा चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिला होता. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive