रुंजी फेम ही मराठी अभिनेत्री महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलीय....बरोबर ओळखलंत मालिका विश्वातला प्रसिध्द चेहरा पल्लवी पाटील ही सोशल मिडीयावर सतत चर्चेत असते. तिने नुकत्याच शेअर केलेल्या एका बोल्ड फोटोमुळे तिने नेटक-यांचं लक्ष वेधलं आहे.
पल्लवी नेहमीच विविध लुक्समधले तिचे फोटो शेअर करते. पण ह्या स्विमींगपूलमधील सनलाईटचा मनमुराद आनंद घेतानाच्या जबरदस्त फोटोची सध्या चर्चा रंगलीय. चाहत्यांनी पल्लवीच्या या बोल्ड फोटोवर लाईक्सचा अक्षरश: वर्षाव केला आहे.
अलिकडेच पल्लवी अग्निहोत्र -२ या मालिकेत संगीता या गोव्यात वाढलेल्या बिनधास्त, बेफिकीर आणि हजरजबाबी मुलीच्या व्यक्तिरेखेत झळकली होती.
मालिकांसह पल्लवी अनेक जाहिरातींमध्येसुध्दा झळकते,
पुढचं पाऊल' फेम संग्राम समेळसोबत पल्लवीने लग्नगाठ बांधली आहे. दोघांच कुसुम मनोहर लेले हे नाटकसुध्दा रंगभूमीव चांगलंच गाजलं.