By  
on  

सिनेसृष्टीतील या खास मैत्रिणींचं अखेर रियुनियन, पाहा फोटो

असं म्हटलं सिनेसृष्टीतील कलाकार एकमेकांचे फार क्वचित मित्र असतात. पण मराठी सिनेसृष्टी मात्र याला अपवाद आहे. मराठी कलाकारांच्या अनेक जोड्या एकमेकांसोबत मैत्रीचा घट्ट बाँड शेअर करतात. त्यापैकीच एक आहे सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे. सोनाली आणि प्रार्थना एकमेकींच्या खास मैत्रिणी आहेत.

 

 

नुकताच या दोघींनी एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये प्रार्थना आणि सोनालीसह प्रार्थनाचा पती अभिषेक आणि सोनालीचा फियॉन्से कुणालही दिसतो आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये प्रार्थना म्हणते, ‘ फायनली, आम्ही भेटलो. आता यांच्या लग्नाच्या प्रतिक्षेत.’  सोनालीने या वर्षाच्या सुरुवातीला कुणाल बेनोडेकरसोबत साखरपुडा केला होता. तिच्या वाढदिवसादिवशी तिने ते जाहीर केलं होतं. सोनाली आणि कुणाल आता लग्नाच्या बेडीत कधी अडकतात याची उत्सुकता प्रत्येकाला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive