By  
on  

चैतन्य ताम्हणे दिग्दर्शित ‘द डिसायपल’ ला व्हेनिस महोत्सवात सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार

मराठी सिनेमा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करतो आहे. चैतन्य ताम्हणे दिग्दर्शित द डिसायपलला हा सन्मान मिळाला आहे. या सिनेमाने जवळपास 19 वर्षांनी व्हेनिस फिल्म फेस्टीव्हलमध्ये भारतीय सिनेमाचं नाव पोहोचवलं आहे. आदित्य मोडक, सुमित्रा भावे, अरुण द्रविड़ आणि किरण यज्ञोपवीत यांनी या सिनेमात मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

या सिनेमाच्या पटकथा लेखनासाठी चैतन्य ताम्हणेला पुरस्कार जाहीर झाला आहे. या शिवाय या सिनेमा मानाचा ‘द इंटरनेशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटिक्स चा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार जिंकणारा द डिसायपल 30 वर्षांतील पहिला सिनेमा बनला आहे. याशिवाय या सिनेमाने कान्स आणि बर्लिन चित्रपट महोत्सवातही आपली छाप सोडली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive