By  
on  

Video : आपला सिध्दू थिरकला ‘तान्हाजी’च्या या गाण्यावर, पुरस्कार सोहळ्याला लागले चार चॉंद

बॉलिवूडमध्ये जसा रणवीर सिंग एनर्जी मॅन म्हणून ओळखला जातो, तसाच आपला हा मराठमोळा सिंबा म्हणजेच अभिनेता सिध्दार्थ जाधव हा पॉवरपॅक एन्टरटेन्मेन्ट आणि एनर्जीचा खराखुरा स्त्रोत मानला जातो. 

अभिनयाप्रमाणेच आपला सिध्दू हा डान्समध्येसुध्दा तितकाच पारंगत आहे. प्रसिध्द  हिंदी डान्स एलिटी शोसुध्दा त्याने आपल्या डान्सच्या जलव्याने काही वर्षांपूर्वी गाजवलं आहे. 

दिमाखदार झी चित्र गौरव 2020 सोहळा नुकताच आपल्या सिध्दूच्या शानदार नृत्याने सजला. 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' या सुपरहिट सिनेमाच्या 'माय भवानी' या गाजलेल्या गाण्यावर सिध्दू या सोहळ्यात थिरकला आणि या सोहळ्याला चार चॉंद लागले. रसिकांनी त्याच्या परफॉर्मन्सला बरभरुन दाद दिली. 

प्रसिध्द कोरिओग्राफर  उमेश जाधव यांनी हे गाणं या सोहळ्यासाठी कोरिओग्राफ केलं होतं. 

 

 

तान्हाजीचा मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत या सोहळ्याला खास उपस्थित होता आणि त्याच्यासमोर हे नृत्य सादर करणं सिध्दूसाठी खुप खास ठरलं. मराठी पाऊल पडते पुढे हा पुरस्कार गेल्यावर्षी सिध्दूला मिळाला होता आणि यंदा त्याच्या हस्ते हा पुरस्कार ओमला प्रदान करण्यात आला. ही त्याच्यासाठी दुहेरी आनंदाची बाब ठरली.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive