By  
on  

अभिनेत्री गायत्री दातारचा हा मराठमोळा साज पाहून तुम्ही प्रेमातच पडाला!

‘तुला पाहते रे’ मालिकेतील ईशा म्हणून अभिनेत्री गायत्री दातार महाराष्ट्राच्या घराघरात आणि रसिकांच्या मनामनांत पोहचली. यातल्या तिच्या पदार्पणातीलच व्यक्तिरेखेतून तिने रसिकांची मनं जिंकली. त्यानंतर ‘युवा डान्सिंग क्वीन’ या डान्स रिएलिटी शोमधून गायत्रीच्या डान्सचा जलवासुध्दा प्रेक्षकांना पाहायला मिळाला. 

सोशल मिडीयावर गायत्री प्रचंड सक्रीय असते. तिचे अनेक स्टायिश फोटोशूट ती चाहत्यांसोबत शेअर करते. पण नुकंतच नऊवारी साडीतलं हे खास फोटोशूट शेअर करत गायत्रीने चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे. 

 

 

गायत्री दातारचा हा नऊवारीतला हा मराठमोळा साज पाहून तुम्ही फिदा नाही झालात, तरच नवल. 

 


 

तिच्या क्युटनेसवर चाहते नेहमीच क्लिन बोल्ड होतात आणि आता त्यात नऊवारी म्हटल्यावर, सोने पें सुहागाच. 


सध्या गायत्री ‘चला हवा येऊ द्या’च्या लेडीज स्पेशल पर्वामध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली  आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive