By  
on  

सुमी साकारणा-या अमृता धोंगडेने शेअर केली भावनिक पोस्ट

मिसेस मुख्यमंत्री प्रेक्षकांचा निरोप घेतला आहेत. येत्या 12 सप्टेबर पासून लाडाची मी लेक ग ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. या मालिकेतील कलाकारांनी शुटच्या शेवटच्या दिवसाचे फोटो आणि व्हिडियो शेअर केला आहे. पण या मालिकेत ठसकेबाज व्यक्तिरेखा साकारणारी सुमीने मात्र एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ठसकेबाज सुमी आणि तिच्या पायलटने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे.  

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

तालुक्यात वर्ल्ड फेमस तात्यांची लाडकी सुमी, खानावळ चालवणारी सुमी, खट्याळ सुमी, बबन ची लाडकी बहीण सुमी, कारखान्यात डबे पोहोचवणारी सुमी , सायकलवर फिरणारी सुमी, पायलट ची सुमी , मंत्री पाटलांची सुन सुमी, घरच्या जबाबदाऱ्या सांभाळणारी सुमी, वाईटाशी दोन हात करणारी सुमी , नवऱ्याच्या पाठीशी उभी राहणारी सुमी , सासूबाईंची खानावळवाली सुमी, मामासाहेब आणि मामी साहेबांची अगाव सुमी, मामांजींची पोरं सुमी , गीता ताई आणि लक्ष्मण दादांची किचनमधली सुगरण सुमी, खोटं जिला आवडत नाही ती सुमी, अन्न म्हणजेच परमेश्वर माननारी सुमी, शिंदे आणि रागिनी ला धडा शिकवणारी सुमी, समर सिंग मंत्री पाटलांची बायको सुमी, म्हणजेच Mrमुख्यमंत्र्याची बायको Mrs मुख्यमंत्री म्हणून मिरवणारी सुमी..!! खरं तर एवढ्या जबाबदाऱ्या मला पार पाडाव्या लागतील ह्याची मला जराही कल्पना नव्हती,पण सुमी ने ते अमृता कडून करून घेतलं..दिसायला सोपी पण करायला खरच खूप अवघड होती सुमी, तेवढीच चंचल पण तेवढीच कठोर.... जीचं शिक्षण सातवी झालंय तिला इतके व्यवहारज्ञान कसं असू शकतं हा मला पण प्रश्न होता , पण सुमी मी ही भूमिका साकारताना मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळत गेली. हा प्रवास कधी संपूच नये असं वाटत होतं, कारण मी रोज सुमी म्हणून जगत होते, माझा आयुष्याचा भाग होती सुमी...!! तिचं साधं राहणं , तिचं खेडवळ बोलणं सगळंच खूप छान वाटत होतं.. मी माझे भाग्य समजते की मला सुमी ही भूमिका साकारायची संधी मिळाली.. आज मालिका जरी संपली असली तरी तुमचं माझ्यावरचं प्रेम हे माझ्या आयुष्यभर सोबत राहील अशी माझी खात्री आहे.. Thank u तुम्हा सगळ्यांना ज्यांनी माझ्यावर इतके प्रेम केलं♥️ Thank u @shwetashinde_official @vajraprod मला संधी दिल्याबद्दल Thank u @zeemarathiofficial अमृताला नवीन ओळख दिल्याबद्दल Thank u @harish_shirke2 मला योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल पुन्हा भेटेन नवीन भूमिकेत हे प्रेम असंच असू द्या

A post shared by Amruta Dhongade (@amrutadhongade_official) on

 

आपल्या पोस्टमध्ये सुमी म्हणते, ‘तालुक्यात वर्ल्ड फेमस तात्यांची लाडकी सुमी, खानावळ चालवणारी सुमी,
खट्याळ सुमी, बबन ची लाडकी बहीण सुमी, कारखान्यात डबे पोहोचवणारी सुमी, सायकलवर फिरणारी सुमी,
पायलट ची सुमी, मंत्री पाटलांची सुन सुमी, घरच्या जबाबदाऱ्या सांभाळणारी सुमी, वाईटाशी दोन हात करणारी सुमी , नवऱ्याच्या पाठीशी उभी राहणारी सुमी , सासूबाईंची खानावळवाली सुमी, मामासाहेब आणि मामी साहेबांची अगाव सुमी, मामांजींची पोरं सुमी , गीता ताई आणि लक्ष्मण दादांची किचनमधली सुगरण सुमी,
खोटं जिला आवडत नाही ती सुमी, अन्न म्हणजेच परमेश्वर माननारी सुमी, शिंदे आणि रागिनी ला धडा शिकवणारी सुमी, समर सिंग मंत्री पाटलांची बायको सुमी, म्हणजेच Mrमुख्यमंत्र्याची बायको Mrs मुख्यमंत्री म्हणून मिरवणारी सुमी..!!
खरं तर एवढ्या जबाबदाऱ्या मला पार पाडाव्या लागतील ह्याची मला जराही कल्पना नव्हती,पण सुमी ने ते अमृता कडून करून घेतलं..दिसायला सोपी पण करायला खरच खूप अवघड होती सुमी, तेवढीच चंचल पण तेवढीच कठोर....
जीचं शिक्षण सातवी झालंय तिला इतके व्यवहारज्ञान कसं असू शकतं हा मला पण प्रश्न होता ,
पण सुमी मी ही भूमिका साकारताना मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळत गेली.
हा प्रवास कधी संपूच नये असं वाटत होतं, कारण मी रोज सुमी म्हणून जगत होते, माझा आयुष्याचा भाग होती सुमी...!! प्रेक्षकांनाही सुमीकी आठवण येईल यात शंका नाही. 
तिचं साधं राहणं , तिचं खेडवळ बोलणं सगळंच खूप छान वाटत होतं..
मी माझे भाग्य समजते की मला सुमी ही भूमिका साकारायची संधी मिळाली..
आज मालिका जरी संपली असली तरी तुमचं माझ्यावरचं प्रेम हे माझ्या आयुष्यभर सोबत राहील अशी माझी खात्री आहे..
Thank u तुम्हा सगळ्यांना ज्यांनी माझ्यावर इतके प्रेम केलं♥️

Recommended

PeepingMoon Exclusive