या मराठी अभिनेत्रीचा थाटात पार पडला साखरपुडा

By  
on  

आता अनलॉकमध्ये हळूहळू सर्व काही सुरळीत होण्याच्या मार्गावर आहे. अनेक कलाकार आपल्या कामाचा श्रीगणेशा करण्यासोबतच आयुष्याची नवी सुरुवातसुध्दा करतायत. आणखी एका प्रसिध्द अभिनेत्रीचा नुकताच साखरपुडा संपन्न झाला आहे. 

अभिनेत्री अंकिता भगत  हिने मोठ्या थाटात आपला  साखरपुडा पार पडल्याचं चाहत्यांना सांगितलं आहे.  १० ऑगस्ट रोजी ती  आपला मित्र गौरव खानकर सोबत एन्गेज झाली आहे.

साखरपुड्याचा आपला एक व्हिडिओ शेअर करत तिने ही आनंदाची  बातमी सर्वांना सांगितली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

When my heart beats for you life gets blissful️ . #EngagementDay #August10th

A post shared by Ankita Bhagat ख्वाबिदा (@ankita_bhagat01_official) on

 

स्टार प्रवाह या वाहिनीवरील “विठू माऊली” या लोकप्रिय मालिकेत अंकिताने जानकीची भूमिका साकारली होती. तसंच “अरण्यक” या दिग्गज कलाकारांचा समावेश असलेल्या नाटकाचाही ती एक भाग बनली होती. याशिवाय ‘युवा डान्सिंग क्वीन ‘ या शोमध्येही स्पर्धक म्हणून सहभागी होत आपल्या डान्सचा जलवा दाखवला होता. त्यात टॉप 6 च्या यादीत तीने आपले स्थान निर्माण केले होते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

New beginning ️ इसका तो खेल खल्लास #engaged

A post shared by Ankita Bhagat ख्वाबिदा (@ankita_bhagat01_official) on

नृत्यात विशेष पारंगत असलेल्या अंकिताला कोळीवाड्याची शान अशीही एक नव्याने ओळख मिळाली आहे. तिने साकारलेला कोळी गीतावरील “मी डोलकर” हा म्युजिक व्हिडीओ खूपच गाजला होता. तिच्या डान्सचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. 

 

Recommended

Loading...
Share