By  
on  

‘अशी ही बनवाबनवी’ला32 वर्ष पूर्ण, रिमेकबाबत सचिन पिळगावकर म्हणतात...

सुपरहिट 'अशी ही बनवाबनवी' या 80 च्या दशकात प्रदर्शित झालेल्या   सिनेमाने लोकप्रियतेचे अनेक उच्चांक मोडले. आजही हा सिनेमा ताजा आणि टवटवीत वाटतो व कितीही वेळा पाहिला तरी सिनेरसिकांचं मन भरत नाही . निखळ मनोरंजन करणा-या ह्या अफलातून 'अशी ही बनवाबनवी'  या सिनेमाला प्रदर्शित होऊन आज 32 वर्ष पुर्ण झाली. 

अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, लक्ष्मिकांत बेर्डे, सुशांत रे ह्या चौकडीबरोबरच नयनतारा, सुधीर जोशी, अश्विनी भावे, निवेदिता सराफ, सुप्रिया व प्रिया बेर्डे यांच्या सदाबहार अभिनयाने हा सिनेमा सजला.

प्रत्येक मराठी सिनेरसिकाच्या मनात ह्या सिनेमाचं एक अढळ स्थान आहे. सिनेमाची गाणीसुध्दा प्रचंड लोकप्रिय झाली होती. तसंच सिनेमाचे संवाद आज ह्या क्षणीसुध्दा तितकेच रंजक पध्दतीने म्हटले जातात. ह्या सिनेमाच्या मीम्सची तरनेटक-यांना नेहमीच भुरळ पडते.

 
आज रिमेकचा जमाना आहे. बॉलिवूडप्रमाणे मराठीतसुध्दा सिनेमांच्या रिमेकचा ट्रेण्ड रुजू होईलसुध्दा. म्हणूनच जर अशीही बनवाबनवी या क्लासिक सिनेमाचा सिक्वल रसिकांच्या भेटीला आला तर...किती मस्त ना..पण याच बाबत सिनेमाचे दिग्दर्शक-अभिनेते सचिन पिळगांवकर काय म्हणतायत, हे जाणून घ्यायला हवं. 


 

ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक  सचिन पिळगावकर एका फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या रिमेकच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगतात, , “अशी ही बनवाबनवीचा रिमेक नाही बनू शकत. कारण आपण ‘लेजंड्स’ गोष्टींना हात लावू नये. आगीशी कधीच खेळू नये. कारण मग त्याची तुलना केली जाईल आणि मग मलाच शिव्या खावे लागणार. ते कशाला करायचं. त्यापेक्षा जे आहे ते राहू द्यायचं. एखाद्या मूळ गोष्टीतच खरा आनंद असतो. तो घ्यायचा असतो. म्हणून आजही हा सिनेमा रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत आहे.”

Recommended

PeepingMoon Exclusive