By  
on  

विचित्र वादळ असे धडकले सप्टेंबर हा ओसरता.., वाचा स्पृहा जोशीची कविता

स्पृहा जोशी ही मराठी सिनेसृष्टीतील गुणी अभिनेत्रींपैकी एक. मराठीसोबतच हिंदीतही स्पृहाच्या अभिनयाची झलक पाहायला मिळते.  अभिनयासोबतच लेखिका आणि एक उत्तम कवियत्री व निवेदिका म्हणूनही तिने आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. विविध मालिका, नाटक आणि सिनेमांमधून स्पृहाने प्रेक्षकांच्या मनात राज्य केलं आहे.. स्पृहा जोशी ही अभिनेत्री म्हणून जितकी लोकप्रिय आहे तितकीच तिच्या कवितांमुळे तिची एक वेगळी ओळख आहे. 'लोपामुद्रा' हा तिचा काव्यसंग्रहसुध्दा प्रसिद्ध आहे.

स्पृहा जोशी अनेकदा सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपल्या कविता सादर करते. नुकतीच एक कविता तिने पोस्ट केली आहे.  ही कविता सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. सप्टेंबर महिन्यात सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणारी करोना महामारीतील ही वास्तववादी कविता रसिकांना खुप भावली आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

विचित्र वादळ असे धडकले सप्टेंबर हा ओसरता.. कुठे हरवला कुणा कळेना सूर्याचा गोळा बुडता? दिवस कधी मावळे कळेना संध्याकाळ कशी झाली उदासीतले रंग माळुनी रात्र पहाटे हिरमुसली.. सन्नाटा इतका आहे की पान एकही वाजेना कारावास बरा वाटावा.. वादळ असले सहवेना श्वास रोखुनी नजरा साऱ्या भेलकांडती.. आली भोवळ.. साऱ्यांना घेऊन भिरभिरते सप्टेंबरचे विचित्र वादळ! - स्पृहा©️

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad) on

 

 

चाहत्यांसह अनेक सेलिब्रिंटींकडून  स्पृहाच्या या कवितेला भरभरुन दाद मिळतेय.

Recommended

PeepingMoon Exclusive