By  
on  

कुटुंबिय येऊ न शकल्याने अलका कुबल यांनी पार पाडले आशालता यांचे अंत्यविधी

‘आई माझी काळूबाई’ या मराठी मालिकेच्या सेटवरील २२ कलाकार व क्रू मेंबर्संना करोनाची लागण झाली. या सेटवरच ज्येष्ठ अभिनेती आशालता वाबगावकर यांचा करोनाने मृत्यू झाला. यावेळी मालिकेच्या निर्मात्या आणि प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांनी आशालता यांचे अंत्यविधी पार पाडले.

 

एका वृत्तपत्राशी बोलताना त्या म्हणाल्या, ‘ मी आणि माझे पती त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये गेले 4 दिवस होतो. त्यावेळी त्यांची प्रकृती स्थिर होती. त्यावेळी त्यांनी आवडीचं भोजनही केलं. त्यांच्या आजारपणाबाबत घरी कळवू नये अशी सक्त सुचना त्यांनी मला दिली होती. काही बरं वाईट झाल्यास त्यांचे शेवटचे विधीही मीच करावेत अशी त्यांची इच्छा होती’.

पण मंगळवारी त्यांची ऑक्सिजन लेव्हल अचानक कमी झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. यावेळी कुटुंबियांनी करोनामुळे येऊ शकत नसल्याने अंत्यविधी मलाच पार पाडण्याची विनंती केली.  असं यावेळी अलका म्हणाल्या. सातारा येथील कैलाश स्मशानभूमी येथे आशालता यांचे अंत्यविधी पार पडले.

Recommended

PeepingMoon Exclusive