By  
on  

Video : निवेदिता सराफ यांच्यात करोनाची कुठलीच लक्षणं आढळली नव्हती

सिनेसृष्टीला लागलेलं करोनाचं ग्रहण काही सुटता सुटत नाहीये. काही दिवसांपुर्वीच ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचा सेटवर करोनाची लागण  झाल्याने निधन झालं होतं. आता अग्गबाई सासूबाई मालिकेतील आसावरी म्हणजेच अभिनेत्री निवेदिता सराफ यांनाही करोनाची लागण झाल्याची बातमी चर्चेत आहे. पण तुम्हाला हे माहितीय का निवेदिता सराफ यांच्यात करोनाची कुठलीच लक्षणं आढळली नव्हती. याबाबतचा एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. 

निवेदिता या व्हिडीओत सांगतात, "माझ्याकडे पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी किती ठणठणीत आहे. मला फक्त थोडी सर्दी झाली होती, पण खबरदारी म्हणून मी टेस्ट करण्याचं ठरवलं आणि माझे स्वॅब दिले. मालिकेच्या प्रोडक्शन टीमने मला या संपू्र्ण प्रसंगात सहकार्य केलं तेव्हापासून रिपोर्ट येईपर्यंत मी घरातच एका बेडरुममध्ये स्वत:ला होम क्वारंटाईन केलं. माझे रिपोर्टस दोन दिवसांनी आले  व मी पॉझिटिव्ह असल्याचा फोन मला आला. माझ्यामुळे कोणीही इन्फेक्ट होऊ नये  याची चिंता मला जास्त होती. घरात माझे पती अभिनेते अशोक सराफ हे डायबेटिक असून त्यांचं वय  73 आहे, ही मोठी रिस्क. याशिवाय घरकामात मला मदतनीस म्हणून काम करणा-या दोन मुलीही आहेत. या तिघांचीही टेस्ट केली आणि सुदैवाने ती निगेटिव्ह आली. तसंच सेटचंही झालं. माझ्या सर्व सहकलाकारांसोबत संपूर्ण युनिटची टेस्ट करण्यात आली व तिही निगेटिव्ह आली, आणि मला हायसं वाटलं"

 

 

"माझा या व्हिडीओ  शेअर करण्या मागचा हेतू इतकाच की कुठलीही शंका आली तर हयगय करु नका, तुमच्यासोबत इतरांचं आरोग्यंही तितकंच महत्त्वाचं आहे," अशी कळकळीची विनंती निवेदिता यांनी सर्वांना केली आहे. 

‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेतील इतर कलाकारांचीही करोना चाचणी करण्यात आली. तेजश्री प्रधान, आशुतोष पत्की, गिरीश ओक यांच्या करोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

 

या प्रकारामुळे गेल्या १५ सप्टेंबरपासून मालिकेची शूटिंग थांबवण्यात आल्याचं कळतंय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive