By  
on  

महाराष्ट्राच्या आदर्श जोडप्याचा फोटो शेअर करत या अभिनेत्याने पूर्ण केलं हे चॅलेंज

सध्या सोशल मिडीयावर अनेक चॅलेंजेसनी धुमाकूळ घातला आहे. जिथे पहावं तिथे तेच सुरु आहे. कपल चॅलेंज, सिंगल चॅलेंज, साडी चॅलेंज अशा नानाप्रकारचे चॅलेंजेस स्विकारण्याचा हेतू काय... तर या परिस्थितीत थोडंसं मनाला बरं वाटावं, विरंगुळा, मजा म्हणून हे सर्व फॅड. 

याच चॅलेंजेसवर आधारित एक अफलातून इन्स्टाग्राम पोस्ट अभिनेता संतोष जुवेकरने केली आहे. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असलेला संतोष म्हणतो,” बरं ते #couplechallenge, आणि #singlechallenge आणि बरीच challenges येतायत. ठीकाय बराय तेवढाच मनाचा त्राण आणि ताण घालवायला छानच आहे..... चालूदे काहीच गैर नाही त्यात पण अजून.....#coronachallenge सुरूच आहे त्याचा विसर नको पडायला.
माफ करा coupleहो आणि singleहो आणि सगळ्याच challengersहो तुमच्या आनंदात विरजण अजिबात घालत नाहीये पण काळजी घ्या आणि छान रहा सुरक्षित रहा.
तसं आता ह्या पुढे अजून खूप challenges पार पडायचीयेत आपल्या सर्वांना.
बाप्पा सर्वांना प्रचंड बळ देवो.
प्रकाश साधनां बाबा आमटे आणि मंदाकिनी देशपांडे आमटे माझं #idolcouplechallenge”

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

बरं ते #couplechallenge, आणि #singlechallenge आणि बरीच challenges येतायत. ठीकाय बराय तेवढाच मनाचा त्राण आणि ताण घालवायला छानच आहे..... चालूदे काहीच गैर नाही त्यात पण अजून..... #coronachallenge सुरूच आहे त्याचा विसर नको पडायला. माफ करा coupleहो आणि singleहो आणि सगळ्याच challengersहो तुमच्या आनंदात विरजण अजिबात घालत नाहीये पण काळजी घ्या आणि छान रहा सुरक्षित रहा. तसं आता ह्या पुढे अजून खूप challenges पार पडायचीयेत आपल्या सर्वांना. बाप्पा सर्वांना प्रचंड बळ देवो. Love u all प्रकाश साधनां बाबा आमटे आणि मंदाकिनी देशपांडे आमटे माझं #idolcouplechallenge #respect #love #life #care #instagram #facebook

A post shared by SanttoshJuvekarofficial (@santoshjuvekar12) on

 

संतोष जुवेकरच्या  या पोस्टवर नेटक-यांनी कॉमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. खरंच प्रकाश आमटे आणि मंदाकिनीताई आमटे यांचा कार्याचं करावं तितकं कौतुक कमीच आहे. त्यांच्या कार्याबद्दल माहित नाही असा व्यक्ती महाराष्ट्रात सापडणं विरळाच.

Recommended

PeepingMoon Exclusive