By  
on  

या मराठी अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबतचा रोमॅण्टिक फोटो केला शेअर

‘खुलता कळी खुलेना’ मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलेली अभिनेत्री अभिज्ञा भावे आज टेलिव्हिजनवरचा एक प्रसिध्द चेहरा आहे. त्यानंतर ‘तुला पाहते रे’ मालिकेतील तिने रंगवलेली  मायरासुध्दा प्रेक्षकांना खुप आवडली. 

मालिकांसह नाटकांमध्येसुध्दा अभिज्ञा काम करते. अलिकडेच तिचं ‘तिसरे बादशाह हम है’ हे नाटक सुनिल बर्वे आणि मयुरी देशमुख या सहकलाकारांसह रंगभूमीवर आलं. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणा-या अभिज्ञाचे विविध मूड्स चाहत्यांना तिच्या अनेक फोटोंमधून पाहायला मिळतात. पण तुम्हाला आठवत असेल तर काही महिन्यांपूर्वी अभिज्ञाने सोशल मिडीयावर एक खास पोस्ट केली होती व चक्क आपल्या प्रेमाची कबुलीच तिने दिली होती. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A visual representation of all my favourite love quotes #youcompleteme @softcvb007

A post shared by Abhidnya bhave (@abhidnya.u.b) on

ती ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडलीय त्याच्यासोबतचा फोटो तिने शेअर केला होता. आत्तासुध्दा तिने बॉयफ्रेंड मैहुल पै सोबतचा एक रोमॅण्टिक फोटो शेअर केला आहे. लव्ह इमोजी कॅप्शनमध्ये देत अभिज्ञाने तु मला पूर्ण केलंस, असं हॅशटॅगमध्ये म्हटलंय 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Always grateful️ #myforever

A post shared by Abhidnya bhave (@abhidnya.u.b) on

 

अभिज्ञाचा प्रियकर  मेहुल पै हा मुंबईत वास्तव्यास असून ‘क्लॉकवर्क्स इव्हेंटस प्रायव्हेट लिमिटेड’ मध्ये तो ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. यातून इव्हेंट मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, फायनान्शियल प्लॅनिंगचा भार तो सांभाळत आहे. तर मराठीसृष्टीत येण्याआधी अभिज्ञा ही एअरहोस्टेस म्हणून कार्यरत होती.

महत्त्वाचं म्हणजे २०१४ साली अभिज्ञा  विवाहबद्ध झाली होती. परंतु नंतर तिने विभक्त होण्याचा निर्णय घेतला, 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive