Photos : या मराठी अभिनेत्रीचं हे झक्कास फोटोशूट होतंय व्हायरल

By  
on  

मराठी मालिकाविश्वातला प्रसिध्द चेहरा असलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया गुरव. छोट्या पडद्यावरच्या अनेक मालिकांमध्ये ती झळकली आहे. अक्षया सोशल मिडीयावर नेहमीच चर्चेत असते. नानाविविध पोस्टमधून ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. आत्तासुध्दा तिने एक झक्कास फेस्टिव्ह लुक शेअर केलं आहे. यात ती खुपच स्टनिंग दिसतेय. 

 

 

अक्षया अलिकडेच प्रसिध्द गायक-संगीतकार अवधूत गुप्ते यांच्या सौरी या म्युझिक अल्बमध्ये झळकली होती.  

 

 

तसंच 'लव्ह लग्न लोचा' आणि 'राधा ही बावरी' या प्रसिध्द मालिकांमधून अक्षयाने लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.  

 

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अनंत महादेवन यांच्या 'बिटर स्वीट’  या मराठी सिनेमात अक्षयाने प्रमुख भूमिका साकारली आहे. हा सिनेमा बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल मधील मानाच्या Jiseok पुरस्कारासाठी नॉमिनेट झाला आहे. साखर उद्योगाच्या आतलं वास्तव या सिनेमातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. साखर उद्योगातील कामगार स्त्रीचं कशाप्रकारे शोषण केलं जातं, यावर हा सिनेमा भाष्य करतो. 

 

 

 

अभिनेत्री अक्षया गुरव ही DOP भूषण वाणी यांच्याशी विवाहबद्ध झाली आहे.   

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Ganpati Bappa Moraya

A post shared by AKSHAYAA GURAV (@akshayaagurav) on

Recommended

Loading...
Share