By  
on  

Photos : आई म्हणते, 'मुली किती झरझर मोठ्या होतात ना..'

तुमच्या आमच्या घरातल्या वात्सल्यमूर्ती आईची तंतोतंत छबी छोट्या पडद्यावर मांडणारी मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते' ह्या मालिकेने अल्पावधितच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं, मालिकेच्या  प्रत्येक भागांची नेहमीच उत्सुकता असते.. आजी-आजोबा, नातवंडं, आई-बाबा असा भरलेला परिपूर्ण परिवार पाहणं म्हणजे एक सोहळाच ठरतो.

आईने अल्पावधितच रसिकांची मनं जिंकून घेतली. छोट्या पडद्यावर आई  साकारणारी  प्रसिध्द अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर ही प्रत्यक्ष  आयुष्यातसुध्दा एका चिमुकल्या लेकीची आई आहे. त्यामुळे हे आईपण पडद्यावर निभावणं तिला जास्त सोप्पं गेलं असणार यात शंका नाही. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणा-या मधुराणीने नुकतंच लेकीच्या लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत ती फार भावूक  झाली. ती कॅप्शनमध्ये म्हणते, 'मुली किती झरझर मोठ्या होतात ना..'. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

किती झरझर मोठया होतात मुली....

A post shared by Madhurani gokhale Prabhulkar (@madhurani.prabhulkar) on

 

यात मधुराणीची लेक स्वराली ही अगदी 2-3 वर्षांची दिसतेय. हा गोड फोटो शेअर करत ती आठवणीत रमून गेली. 

-

 

या मायलेकींचं जबरदस्त बॉण्डींग नेहमीच मधुराणी शेअर करत असलेल्या फोटोंमधून पाहायला मिळतं . 

 

 ंलॉकडाऊनच्या संपूर्ण काळ मधुराणीने स्वरालीसोबत क्वालिटी टाईम म्हणून घालवला. आता शूटिंगमुळे व्यस्त असलेल्या मधुराणीला लेकीसाठी वेळ काढणं तसं कठीणच असतं. पण स्वरालीचे बाबा प्रमोद प्रभुलकर तिची आईसारखीच काळजी घेतात म्हणून मधुराणी पडद्यावर 'आई' साकारु शकते, हे मधुराणीनेच एका कार्यक्रमात  सांगितलं होतं.  

Recommended

PeepingMoon Exclusive