PeepingMoon Exclusive: स्वप्निल जोशी आणि तेजस्विनी पंडीतचा 'समांतर -2' मधून समोर आला रोमॅण्टिक अंदाज

By  
on  

मराठी सुपरस्टार  स्वप्निल जोशीच्या दमदार अभिनयाने समांतर ही मराटी वेबसिरीज प्रचंड गाजली. आता रसिक प्रेक्षकांना या वेबसिरीजच्या दुस-या भागाची कमालीची उत्सुकता लागली आहे. अनलॉकमध्ये 'समांतर -२' च्या चित्रीकरणाला सुरुवात झाल्याचं आपल्या सर्वांनाच माहितीय. कुमार महाजन हे स्वप्निल जोशी साकारत असलेल्या व्यक्तिरेखेच्या आयुष्यात ती दुसरी बाई कोण येणार हे जाणून घेण्यासाठी रसिक आतुर झाले आहेत 

परंतु नुकतंच  पिपींगमून मराठीच्या हाती स्वप्निल जोशी आणि तेजस्विनी पंडीत स्टारर 'समांतर -२' वेबसिरीजच्या सेटवरचे एक्सक्ल्युझिव्ह फोटो लागले आहेत. कुमार महाजनच्या पत्नीची व्यक्तिरेखा तेजस्विनी या वेबजसिरीजमध्ये साकारतेय. एका मध्यमवर्गीय कुटुंबाची ही असामान्य गोष्ट  आहे. 

स्वप्निल जोशी आणि तेजस्विनी पंडीत यांचा ह्या फोटोंमध्ये जबरदस्त रोमॅण्टिक अंदाज पाहायला मिळतोय. 
 

Recommended

Loading...
Share