Peepingmoon Exclusive: पर्यावरण विषयातील डिग्री असल्याचा पदोपदी फायदा : सुयश टिळक

By  
on  

सुयश टिळक पर्यावरणाबाबत सतत जागरुक असतो. तो अनेकदा पर्यावरणाशी निगडीत अनेक पोस्टही चाहत्यांशी शेअर करत असतो.  विशेष म्हणजे सुयशने पर्यावरण विषयातील डिग्री मिळवली आहे. या पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने सुयशने पीपिंगमून मराठीशी खास बातचीत केली आहे. 

 

पर्यावरणाशी संदर्भात कोणत्या Ngo शी जोडला गेला आहेस का? 

-    खरं तर मी पर्यावरण विषयातील डिग्री घेतली आहे. पण कॉलेजनंतर अभिनय हा करिअर ऑप्शन निवडल्याने यात करिअर करता आलं नाही. पण मी माझ्यापरिने इको फ्रेंडली लाईफस्टाईल जगण्याचा प्रयत्न करत असतो. पण माझे काही मित्र या क्षेत्रात आहेत त्यांच्याकडून मी वेळोवेळी अपडेट घेत असतो. मी अनेकदा वृक्षारोपण करतो. पण केवळ झाडं लावत नाही तर ते लावलेलं झाडं नीट वाढतं आहे ना याचीही अपडेट देत असतो. 

तू तुझ्या व्यस्त वेळापत्रकातून पर्यावरणसंबंधित आवडींसाठी वेळ कसा काढतोस? 

मला वाटतं पर्यावरण संदर्भात वेळ नाही, बिझी आहे ही खुप तकलादू कारणं आहेत. मुळातच या सर्वांची मनापासून आवड असणं गरजेचं आहे. कारण हा विषय मानवी अस्तित्वाशी जोडला आहे. त्यामुळे यासाठी कारणं देणं मला इष्ट वाटत नाही. पर्यावरण सांभाळणं म्हणजे खुप भव्य असं काही करावं लागत नाही. अगदी प्रत्येकाने ठरवलं की कमीत कमी कचरा करायचा तर यातून बराच फरक पडू शकतो. अगदी समुद्रात कचरा टाकू नये ही अगदी मूलभुत गोष्ट अवलंबू शकतो. पर्यावरण संवर्धन आपण शाळेत असल्यापासून ऐकत असतो. पण दुर्दैवाने त्या कोणीच पाळत नाही. अशाप्रकारे आपणच आपल्या विनाशाची बातमी लिहित आहोत. याला आपल्यापैकी जवळपास सगळेचजण जबाबदार असणार आहेत. 

 

 

तुझ्या लाईफस्टाईलमध्ये काही इको फ्रेंडली गोष्टी वापरतोस का? 

-    मी माझ्या लाईफस्टाईलमध्ये छोट्या छोट्या गोष्टी अवलंबतो. जसं मी माझ्या घरात मी प्लॅस्टीकचा वापर अजिबात करत नाही. कुठल्याही प्रकारच्या प्लॅस्टीकच्या पिशव्या, बॉटल्स वापरल्या जात नाही. याशिवाय मेक अप उतरवताना टिश्यू पेपर वापरले जातात. मी अजिबात टिश्यु पेपर वापरत नाही. याऐवजी मी कॉटन वाईप्स वापरण्यावर भर देतो. याशिवाय एको फ्रेंडली कपडे वापरतो. किंवा रिसायकल्स वस्तू वापरण्याकडे कल असतो. पाणी, वीज यांचा गरजेपुरताच वापर करणं हे मी पाळतो. विजेचा अपव्यय टाळणारे गॅझेट्स वापरण्यावर भर देत असतो.

 

Recommended

Loading...
Share