Exclusive: प्रार्थनासोबतची ऑफस्क्रीन आणि ऑनस्क्रीन दोन्हीही ठिकाणी उत्तम बाँडिंग: भुषण प्रधान

By  
on  

 

अभिनेता भुषण प्रधान सध्या ‘अजिंक्य’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या सिनेमात त्याची भूमिका एका महत्त्वाकांक्षी तरुणाची आहे. याबाबतचा अनुभव त्याने पीपिंगमून मराठीशी एक्स्लुसिव्ह शेअर केला आहे.. पाहू काय म्हणतो तो...

तुझ्या ‘अजिंक्य’मधील भूमिकेविषयी सांग 

: अजिंक्य या सिनेमात मी अजिंक्यच्या भूमिकेत आहे. तो अतिशय महत्त्वकांक्षी तरुण आहे. आयुष्यात त्याचं ध्येय ठरलेलं आहे. हे मिळवण्यासाठी तो अफाट मेहनत घेतानाही दिसतो. त्यामुळे त्याला जे हवं आहे ते त्याला मिळतं देखील. त्याच्या यशाबाबतच्या संकल्पना स्पष्ट आहेत. त्यामुळे ध्येयापर्यंत कसं पोहोचायचं त्याला नक्कीच माहिती आहे. 
पण यशामागे धावताना अजिंक्य कोणत्याही शॉर्टकटचा अवलंब करत नाही. पण ध्येयामागे धावताना तो थोड्या जास्त प्रमाणात प्रॅक्टिकल किंवा मटेरिअ‍ॅलिस्टीक झालेला असतो. त्यामुळे अनेकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी, आसपासच्या व्यक्ती यांच्याकडे त्याचं आपसूकच दुर्लक्ष होत असतं. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर रितीका म्हणजेच प्रार्थना ज्यावेळी त्याच्या आयुष्यात येते त्यावेळी आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळते. खरंतर हा रोमॅंटिक सिनेमा आहे. त्यामुळे प्रेक्षकांना हा सिनेमा नक्कीच आवडेल. 

 

 

प्रार्थनाच्या आणि तुझ्या ऑफस्क्रीन आणि ऑनस्क्रीन केमिस्ट्रीबाबत काय सांगशील? 

: खरं तर मी आणि प्रार्थना यापुर्वी ‘कॉफी आणि बरंच काही’ या सिनेमात दिसलो होतो. त्यावेळी माझा तिचा स्क्रीन टाईम फारसा नव्हता. पण आमची मैत्री खुप आधीपासून होती. आमच्या मैत्रीला खोडकरपणा, भांडणं असे अनेक पदर आहेत. दिवसेंदिवस हे बाँडिंग अधिक घट्ट झालं आहे. प्रार्थना माझी जवळची मैत्रिण असल्याने काम करताना एक कम्फर्ट झोन होता. त्यामुळे सिनेमातील केमिस्ट्रीही छान जमून आली. या बाँडिंगमुळे सिनेमातील रोमॅंटिक किंवा इमोशनल सीनमध्ये अधिक जिवंतपणा वाटतो. 

 

तु आणखी कोणत्या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या समोर येणार आहेस? 

: ‘अन्य’ नावाच्या सिनेमातून मी रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात रायमा सेन, अतुल कुलकर्णी, तेजश्री प्रधान यांच्या भूमिका आहेत. याशिवाय ‘लग्नकल्लोळ’ नावाचा सिनेमाही लवकर रिलीज होणार आहे. यात मी,मयुरी देशमुख आणि सिद्धार्थ जाधव यांच्याही भूमिका आहेत. याशिवाय मी आणि प्रार्थना पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार आहोत.

Recommended

Loading...
Share