By  
on  

#Exclusive: सलमान माझ्याशी सेटवर पुर्णवेळ मराठीतच बोलायचा: प्रवीण तरडे

मराठमोळे अभिनेते प्रवीण तरडे सलमानच्या आगामी ‘राधे’ सिनेमात झळकणार असल्याचं पीपिंगमून मराठीने सर्वात आधी सांगितलं होतं. आता खुद्द प्रवीण तरडेंनीच याची पुष्टी केली आहे. पीपिंगमून मराठीशी केलेल्या एक्सक्लुसिव्ह बातचीतमध्ये प्रवीण यांनी सिनेमाशी संबंधित अनेक बाबी शेअर केल्या. प्रवीण म्हणतात, ‘या सिनेमात काम करण्याचा अनुभव फॅन्टस्टिक होता. ही भूमिका कोणती आहे हे सांगणं शक्य नसलं तरी मराठी माणसाची व्यक्तिरेखा आहे.

 

माझी भूमिकेची लांबी फारशी मोठी नसली तरी खुप इंटरेस्टिंग व्यक्तिरेखा माझ्या वाट्याला आली आहे.’ सलमानसोबत काम करण्याच्या अनुभवाबाबत प्रवीण सांगतात’, ‘सलमानसोबत काम करण्याचा अनुभव उत्तम होता. विशेष म्हणजे सेटवर सलमान आणि माझ्यातील संभाषण हे पुर्णपणे मराठीतूनच व्हायचं. सलमान खुप उत्तम मराठी बोलतो. त्यामुळे सेटवर माझ्यासाठी मराठमोळं वातावरण होतं.’ 

सलमान आणि प्रवीण हे केवळ राधेच्या निमित्ताने एकमेकांना भेटले नाहीत तर प्रवीण यांच्या मुळशी पॅटर्न सिनेमाचा सलमान चाहता आहे. अरबाज खानने ‘मुळशी पॅटर्न’ सिनेमाचा हिंदी रिमेक बनवण्याचं ठरवलं आहे. यासाठी सलमानने प्रवीण यांच्याकडून हक्कही विकत घेतले आहेत. 
प्रवीण तरडे यांनी ‘मुळशी पॅटर्न’, ‘देऊळ बंद’, या सिनेमांचं लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय ही 'त्रि'सूत्री जबाबदारी सांभाळली आहे. आता ‘राधे’मध्ये प्रवीण आणि सलमान काय धमाल करतात याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive