EXCLUSIVE : लोकल फोनने मेसेज करून माझ्याकडून पैसे मागण्याचा खंडणी मागणाऱ्याचा मुर्खपणा - महेश मांजरेकर

By  
on  

प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेता महेश मांजरेकर यांना आलेल्या खंडणीच्या मेसेजच्या बातमीने खळबळ उडाली. महेश मांजरेकर यांना चक्क अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या नावाने खंडणीसाठी धमकी आल्याचं हे वृत्त समोर आलं. खंडणी मागणाऱ्याने चक्क 35 कोटींची मागणी केली होती. या प्रकारानंतर महेश मांजरेकरांनी ते मेसेज पोलीसांना दिले आणि पोलीसांनी एका व्यक्तिला अटकही केली आहे. 

याविषयी पिपींगमूनशी बोलताना महेश मांजरेकर यांनी हा प्रकार नेमका काय होता याविषयी थोडक्यात माहिती दिली. महेश मांजरेकर सांगतात की, "माझ्या फोनवर मला एक मेसेज आला आणि त्याने माझ्याकडे पैश्यांची मागणी केली. मी तो मेसेज पोलीसांना दिला आणि पोलीसांनी त्याला पकलडलं आहे. याच्यापलीकडे मला काहीही झालेलं नाही. तो अगदीच मुर्ख असावा कारण त्याने लोकल फोनवरुन मला मेसेज केला. मला त्याने साधा मेसेज केला होता व्हॉट्सऐपवर केला नाही . तो गरीब बिचारा त्याला कदाचित फ्रस्टेशन आलेलं असावं सध्याच्या परिस्थितीत पैसे कुठून आणायचे म्हणून त्याने माझ्याकडे पैसे मागीतले असावे."

यावरुन खंडणीसाठी पाठवलेला हा मेसेज एखाद्या गरीबीने त्रस्त असलेल्या व्यक्तिचा असण्याची शक्यता महेश मांजरेकर यांनी व्यक्त केली आहे. त्या व्यक्तिला मात्र आता रत्नागिरीतून अटक करण्यात आली असून खंडणी पथक या प्रकाराचा शोध घेत आहेत. मात्र खंडणी मागणाऱ्यााने हे मेसेज अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या नावाने केले असल्याने या तपासात काय समोर येईल हे महत्त्वाचं आहे. 

Recommended

Loading...
Share