By  
on  

Exclusive: ‘बिग बॉस’ फेम रुपाली भोसले सांगतीये तिच्या ‘प्रेमाची गोष्ट’

बिग बॉसच्या घरातील संवेदनशील खेळाडू म्हणून आपण रुपाली भोसलेला ओळखतो. रुपालीने ‘बडी दूर से आये है’, मन उधाण वा-याचे या मालिकांमधून रुपाली प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. पण बिग बॉसने तिचं नाव सर्वतोपरी झालं. रुपालीने अलीकडेच बॉयफ्रेंड अंकित मगरेशी असलेल्या नात्याची गोष्ट सोशल मिडियावर शेअर केली. यावेळी ‘पीपिंगमून मराठी’ने तिच्याशी खास संवाद साधला. रुपालीने तिच्या प्रेमाशी गोष्ट पीपिंगमूनच्या चाहत्यांशी शेअर केली....

 

 

 

अंकितच्या आणि तुझ्या बाँडिंगबद्दल काय सांगशील? 

अंकितचं माझं नात खुपच स्पेशल आहे. यात ठरवून असं काहीही झालं नाही. मला असं नेहमी वाटायचं की माझ्या पार्टनरला माझे आई-वडील कायमच जवळचे वाटायला हवेत. माझ्या आई-वडिलांना स्वत:च्या आई-वडिलांइतकीच किंमत देणारा पार्टनर मला हवा होता. मी आता कुटुंबियांसाठी जे काही करत आहे त्याचा आदर करणारी व्यक्ती मला माझ्या आयुष्यात हवी होती. माझं आताचं जे सोशल स्टेटस आहे. किंवा भविष्यात मी जे काही निर्णय घेईन त्याला पाठींबा देणारा पार्टनर मला पाहिजे होता. अंकितमध्ये मला हे सगळे गुण सापडले. त्यामुळे मी त्याच्यासोबत खुष आहे. 

 

 

अभिनेत्रीच्या नात्याबाबत बातमी आली की लग्नाच्या चर्चाही होऊ लागतात. तुम्ही दोघांनी लग्नाबाबत काय विचार केला आहे? 

कोणत्याही नात्यात एका ठराविक पातळीनंतर हा विचार येतो. पण सध्यातरी आमच्या दोघांचाही असा विचार नाही. मला या बाबतीत कोणतीही घाई नाही किंवा फार लांबवतही ठेवायचं नाही. आम्हाला आमच्या घरच्यांबाबत असलेल्या जबाबदा-या पार पाडायच्या आहेत. अंकितही फॅमिलीला महत्त्व देणारा मुलगा आहे. त्याला घरच्यांच्या प्रती असलेल्या जबाबदा-यांची पुर्ण जाणीव आहे. याशिवाय मलाही आई, बाबा, संकेत यांच्यासाठी भरीव काहीतरी करायचं आहे. जेणेकरून मी असेन अगर नसेन त्यांना कशाचीही कमतरता जाणवली नाही पाहीजे. या सगळ्या जबादा-या पार पाडूनच आम्ही हा विचार करणार आहोत. त्यामुळे सध्या मी रिलेशनशीपमध्ये असणं एंजॉय करत आहे. 

 

 

सध्या काय करत आहेस? 

सध्या मी ‘गांधी हत्या आणि मी’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 20 डिसेंबरला या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग झाला. तेव्हापासून नाटकाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हे नाटक माझं 11वं व्यावसायिक नाटक आहे. या नाटकाच्या माध्यमातून जवळपास पाच वर्षांनी मी रंगभूमीवर आले आहे. खरं तर सिरियल्स आणि नाटकं यांचा ताळमेळ बसवणं जवळपास अशक्य असतं. त्यामुळे नाटकालाच जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि या प्रयत्नाचंसगळीकडे कौतुकही होताना दिसत आहे. या नाटकाच्या माध्यमातून अभिनेत्री म्हणून माझं होणारं संक्रमण सुखावणारं आहे.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive