Exclusive: आमीर खानचा मुलगा जुनैद खान या मराठी मुलीसोबत करणार बॉलिवूड डेब्यु

By  
on  

आमीर खानचा मुलगा जुनैद खान यशराजच्या हिस्टॉरिकल ड्रामामधून बॉलिवूड डेब्यु करत आहे. या सिनेमाला सिद्धार्थ मल्होत्रा दिग्दर्शित करत आहेत. हा सिनेमा एका ख-या घटनेवर आधारित असल्याचं समजत आहे. विपुल मेहता आणि स्नेहा देसाई यांनी या सिनेमा लिहिला आहे. मल्होत्रा यांनी यापुर्वी राणी मुखर्जीच्या ‘हिचकी’ चं दिग्दर्शन केलं आहे. जुनैदसोबत या सिनेमात मराठमोळी शर्वरी वाघ दिसते आहे.

धार्मिक गुरु जदुनाथजी बृजरतनजी महाराज यांच्या कृष्णकृत्याबाबत गुजराती पत्रकार करसदास मुलजी यांनी लिहिलेल्या आर्टिकल भोवती सिनेमा फिरतो. या आर्टिकलमध्ये महिलांच्या शोषणाबाबत आणि भक्तांच्या पत्नीशी गैरवर्तन करण्याच्या कृत्यावर हा पत्रकार प्रकाश टाकत असतो. जुनैद फॉरेस्ट गम्प मधून डेब्यु करण्याचा अफवा होत्या. पण तो आता यशराजच्या सिनेमात दिसणार असल्याचं समोर येत आहे.

Recommended

Loading...
Share