Exclusive: दिनेश विजानच्या आगामी ‘दसवी’मध्ये भ्रष्ट नेत्याच्या भूमिकेत दिसणार अभिषेक बच्चन

By  
on  

पीपिंगमूनने तुम्हाला काही दिवसांपुर्वीच सांगितलं होतं की, अभिषेक बच्चन दिनेश विजानच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात अभिषेक बच्चन आणि यामी गौतम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अभिषेक या सिनेमात भ्रष्ट, अ‍शिक्षित नेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. पुढील वर्षी या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात होत आहे.

 

हा भ्रष्ट नेता जेलमध्ये जातो पण तेथील श्रमाची कामं टाळण्यासाठी दहावीची परिक्षा देणार असल्याचं जाहीर करतो.  यामी या सिनेमात जेलरच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिषेकच्या पत्नीच्या रुपात निमरत कौर दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अभिषेक पुन्हा एकदा राजकारण्याची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. यापुर्वी त्याने पा सिनेमात अशी भूमिका साकारली होती.

Recommended

Loading...
Share