PeepingMoon Exclusive: बॉलिवूडचे ज्येष्ठ PRO राजू करिया यांचं हदयविकाराच्या झटक्याने निधन

By  
on  

बॉलिवूडचे प्रसिध्द पीआरओ राजू करिया यांचं निधन झालं. हदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची मुलगी सोनल करिया हिने त्यांच्या निधनाची माहिती दिली. 
राजू करिया यांनी जवळपास पन्नास वर्ष बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काम केलं आहे. ते एकमेव असे होते ज्यांनी राज कपूरच्या तीन्ही पिढ्यांसोबत काम केलंय.त्यांनी राज कपूर, रणधीर कपूर आणि करिश्मा कपूरसोबत काम केलं आहे.

तसंच दिलीप कुमार, राजेंद्र कुमार, देव आनंद, शम्मी कपूर , धर्मेंद्र, अमिताभ बच्चन यांच्यासाठी पण काम केलं आहे. याशिवाय  गोविंदा, सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्यासाठीसुध्दा राजू करिया पीआरओ म्हणून काम पाहायचे. 

 

Recommended

Loading...
Share