Exclusive: आशुतोष गोवारीकरांच्या आगामी अ‍ॅक्शन सिनेमात फरहान अख्तर दिसणार?

By  
on  

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आता ऐतिहासिक सिनेमामधून ब्रेक घेताना दिसत आहेत. याशिवाय त्यांचा इंटरनॅशनल प्रोजेक्टही लवकरच आकारास येईल. याशिवाय आशुतोष एक्सेल एंटरटेनमेंट बॅनरसाठी पुढील सिनेमासाठी काम करत आहेत. 

 

आशुतोष सध्या अ‍ॅक्शन सिनेमाची तयारी करत आहे. यामध्ये फरहान अख्तर मुख्य भूमिकेत आहे. या अनटाईटल्ड सिनेमाचा सेट जंगलमध्ये लावला जाईल. फरहान या वन रेंजरच्या भूमिकेत दिसेल. याशिवाय सिनेमात व्हिलनच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध बॉलिवूड कलाकार आहेत.

याशिवाय इतर स्टारकास्टचा खुलासा झाला नाही.  हा प्रोजेक्ट खास आहे. कारण फरहानचे वडिल जावेद अख्तर हा सिनेमा स्वत: लिहित आहेत. 15 वर्षांनंतर ते लेखक म्हणून कमबॅक करत आहेत. वर्षखेरीस स्क्रिप्ट लॉक केली जाईल. गोवारिकर त्यांच्या अमेरिकी म्युझिकल शोसाठी काम करत आहेत.

Recommended

Loading...
Share