By  
on  

Exclusive: न्युड फोटोबाबत मिलिंद सोमण म्हणतो, ‘हे काही मी पहिल्यांदाच केलं नाही’

गेले काही दिवस मिलिंद सोमण चर्चेत होता ते त्याच्या न्युड फोटोशुटमुळे. गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर न्यूड फोटोशूटप्रकरणी मॉडेल व अभिनेता मिलिंद सोमणविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.  याविषयी मिलिंदने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. 

 

यावेळी ‘पीपिंगमून’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मिलिंद म्हणतो, ‘ मी हे अनेकदा केलं आहे. पहिल्यांदा केलं होतं त्याची बातमी झाली होती. मी जेव्हा जेव्हा न्यूड फोटोशूट करतो, तेव्हा त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असतात.  नग्न व्यक्ती म्हणजे काय? जसं देवाने आपल्याला बनवलंय तेच. 
असं नाहीये ना की आपण इंटरनेटवर नग्न लोकांना पाहू शकत नाही. इन्स्टाग्रामवर असे बरेच न्यूड फोटो असतात. यावर प्रत्येकाची मतं वेगळी असू शकतात.’  मिलिंद ‘पौरषपूर’ या आगामी वेब सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.  या सिरिजमध्ये तो डोळ्यांना काजळ, नाकात नक्षीकाम केलेली नोस रिंग आणि कपाळावर भलीमोठी टिकली या हटके लूकमध्ये दिसला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive