Exclusive: ‘मुगल’ च्या शुटिंगसाठी आमीरची ‘विक्रम वेधा’च्या शुटिंगमधून माघार

By  
on  

नीरज पांडेची विक्रम वेधाच्या घोषणा झाली खरी पण हा सिनेमा पुर्णत्वास जाण्याची चिन्ह दिसेनात. या सिनेमात शाहरुख खान दिसणार असं बोललं जात होतं पण शाहरुखने दिग्दर्शक बदलण्याची मागणी केली. त्यानंतर सैफ आणि आमीर या सिनेमात दिसणार होते. पण करोनामुळे सिनेमा पुढे ढकलला गेला. 

पण आता सिनेमा बंद पडला असल्याचं समोर येत आहे. आमीरने हा सिनेमा करण्यास नकार दिला आहे. या सिनेमाच्या कथेबाबत समाधानी नसल्याने त्याने हा निर्णय घेतला आहे.  दिल चाहता है नंतर आमीर आणि सैफची जोडी पहिल्यांदाच या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र येणार होती. आता आमीर बाहेर पडल्यानंतर हा सिनेमा कधी बनेल हे सांगणं शक्य नाही. सध्या आमीर ‘लाल सिंह चढ्ढा’ च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा पुढील फेब्रुवारीमध्ये पुर्ण होईल. त्यानंतर तो ‘मोगुल’ च्या शुटिंगला सुरुवात करेल.

Recommended

Loading...
Share