PeepingMoon Exclusive: हृतिक रोशनच्या वेब डेब्यूबद्दल जाणून घ्या सविस्तर

By  
on  

सध्या करोना संकटामुळे जग खुपच बदललं आहे, त्यामुळे अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडत आहेत. करोनातून सावरायला आणखी किती वेळ लागेल याची कोणालाच कल्पना नाही.  लॉकडाऊनमुळे जवळपास सात-आठ महिने सिनेमा थिएटर्स बंद होती, त्यामुळे अनेकांनी सिनेमे प्रदर्शित करण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधार घेतला आहे. तसंच अनेक मोठमोठ्या कलाकारांनी ओटीटीकडेच आपला मोर्चा वळवला. अशातच आता पिपींगमूनच्या हाती एक एक्सक्ल्युझिव्ह वृत्त आले आहे. ते म्हणजे सुपरस्टार हृतिक रोशन आपला वेब डेब्यू कण्यासाठी सज्ज झाला आहे. 

पिपींगमून डॉट कॉमला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार प्रसिध्द ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्नी-हॉटस्टारसोबत हृतिक रोशनची या वेबसिरीजसंदर्भात चर्चा सुरु आहे. ब्रिटीश असलेली छोटी वेब सिरीज द नाईट मॅनेजरची ही भारतीय आवृत्ती असेल. अभिनेता टायगर श्रॉफसोबतचा एक्शन-थ्रीलर वॉर हा हृतिकचा लास्ट रिलीज सिनेमा आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर तब्बल 300 कौटींचा गल्ला जमवत बक्कळ कमाई केली. तसंच या वेबसिरीजसाठी हृतिकला या ओटीटी प्लॅटफॉर्मकडूनही तगडं मानधन मिळतंय. तसंच लवकरच म्हणजे नव्या वर्षात मार्चमध्ये हतिक या वेबसिरीजच्या शूटींगचा श्रीगणेशा करणा असल्याचं समजतंय. 

 

Recommended

Loading...
Share