Peepingmoon Excluive: श्रीराम राघवन लवकरच करणार ओटीटी डायरेक्टोरिअल डेब्यु

By  
on  

 दिग्दर्शक श्रीराम राघवन वरुण धवनसोबत ‘इक्कीस’ या सिनेमाची सुरुवात करणार होते. पण लॉकडाऊन, त्यानंतर लोकेशनवरील विसंगत तापमान त्यामुळे हा सिनेमा सप्टेंबरमध्ये फ्लोअरवर जाईल. मधल्या काळात श्रीराम राघवन श्रीराम राघवन डेब्युसाठी सज्ज झाले आहेत. पीपिंगमूनला एक्सक्लुसिव्हली मिळालेल्या माहितीनुसार  श्रीराम राघवन कंधार हायजॅकिंगवर वेबसिरीज बनवणार असल्याचं समोर येत आहे. 1999 मध्ये  हे हायजॅकिंग घडलं होतं. या सिरीजमधून ते वेब डेब्युही करतील. या सिरीजसाठी ते तयारीला लागले आहेत. त्यांची टीम या विमानातील प्रवाश्यांसोबत बोलत आहे. 

एक थ्रिलररुपात हा सिनेमा सादर करण्याचा राघवन यांचा मानस आहे. ही सिरीज कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे हे मात्र स्पष्ट झालं नाही. या प्रकरणावर यापुर्वीही सिनेमे बनवून झाले आहेत.  2010 मध्ये मोहनलाल आणि अमिताभ बच्चन स्टारर मल्याळम सिनेमा कंधार, नागार्जुनचा गगनम आणि अजय देवगन, अभिषेक बच्चन आणि बिपाशा बसु स्टारर ज़मीन (2003) हे सिनेमे हायजॅकिंग वर आधारित आहेत.

Recommended

Loading...
Share