PeepingMoon Exclusive: दिग्दर्शक अनुभव सिन्हांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये गुप्तहेराच्या भूमिकेत झळकतोय आयुष्यमान खुराना

By  
on  

आर्टिकल 15 या क्राईम थ्रीलर सिनेमात गुन्ह्याचा छडा लावणारा कर्तव्यदक्ष पोलिस साकारुन आय़ुष्यमानने रसिकांवर छाप पाडली. या सिनेमानंतर पुन्हा एकदा आयुष्यमान दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्यासोबत नव्या प्रोजक्टनिमित्त जोडला जातोय. 

पिपींगमून डॉटकॉमला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार आयुष्यमानने सिन्हा यांचा आगामी एक्शन –थ्रिलर सिनेमा साईन केला आहे. यात तो एका

सिक्रेट मिशनवर असून त्यात तो गुप्तहेराच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.जानेवारीच्या तिस-या आठवड्यात या आगामी सिनेमाचं शूटींग सुरु होण्याची शक्यता आहे. 


 

सत्य घटनांवर आधारित हा सिनेमा असणार असल्याचं म्हटलं जातंय. राजकीय पार्श्वभूमीसुध्दा या सिनेमात असण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. 
लॉकडाऊन दरम्यान जून 2020 पासून अभिनेता आयुष्यमान खुराना हा आपल्या मूळ घरी चंदीगढमध्येच होता. पण सध्या तो मुंबईत परतला असून लवकरच या सिनेमाच्या शूटींगचा श्रीगणेशा करणार आहे. आयुष्यमानच्या या नव्या सिनेमाविषयी चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता असणार यात शंका नाही. 

 

 

Recommended

Loading...
Share