Exclusive: पाहुण्यांच्या यादीत सलमान-कतरिनापासून ते अर्जुन-जान्हवीचा संगीत परफॉर्मन्स, असा आहे वरुण धवन-नताशाचा वेडिंग प्लॅन

By  
on  

 
बॉलिवूडचा मोस्ट एलिजेबल बॅचलर आणि लाखो तरुणींच्या हदयाची धडकन  वरुण धवनच्या लग्नाचे आाता सर्वांना वेध लागले आहेत. वरुण गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत अलिबागमधील किहिम बीचवर लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. या जोडीच्या लग्नाला जवळपास 200 पाहुणे येण्याची शक्यता आहे. करोनामुळे या जोडीचं लग्न मागील वर्षापासून रखडलं होतं. 
आता पीपिंगमूनला Exclusively समजलं आहे की #Varusha  चं लग्न पाच दिवसांचा सोहळा असणार आहे. 22 जानेवारीपासून या लग्नाचे विधी सुरु होतील. 26 तारखेला बॉलिवूडसाठी रिसेप्शन असणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवरी नताशाने तिचा लेहंगा स्वत: डिझाईन केला आहे. नताशाने अमेरिकेमध्ये फॅशन डिझायनिंगची पदवी घेतली आहे. तर कुणाल रावलने वरुणचा ड्रेस डिझाईन केला आहे. असा असणार आहे या जोडीचा वेडिंग प्लॅन 

               ‘तारांकित’ संगीत 

या संगीतला बॉलिवूडचे अनेक कलाकार हजेरी लावणार आहेत. यामध्ये सारा अली खान, करण जोहर, मनीष मल्होत्रा, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, जान्हवी- खुषी कपूर, जॅकी भगनानी, कतरिना कैफ, नीतू कपूर, कियारा आडवाणी, रिहा कपूर, अनिल कपूर, हर्षवर्धन कपूर आणि शशांक खैतान हजेरी लावणार असल्याचं समजत आहे.

 

वरुणची खास मैत्रिण सोनम सध्या ग्लासगो मध्ये असल्याने येऊ शकत नाही. करण नेहमीप्रमाणे या ही रात्र धमाकेदार करणार असल्याचं बोललं जात आहे. डेव्हिड धवन यांचे खास मित्र या लग्नाला हजेरी लावतील. 

 

               मेहंदी है रचनेवाली 

मेहंदीचा दिवसभराचा कार्यक्रम असेल. 

                   चीअर्स टू कॉकटेलही नाईट 

वरुण आणि नताशा झगमगीत कॉकटेल पार्टीचे होस्ट असतील.

                                वरुण की दुल्हानिया 

वरुण आणि नताशा सनसेट वेडिंग करणार आहे. अलिबागच्या बीचवर हा सोहळा साजरा होणार आहे. 

       रिसेप्शन 

लग्नानंतर या जोडीचं रिसेप्शन असेल. 

        रिसेप्शन 2.0 

दीप-वीर, निक-प्रियांका, अनुष्का-विराट यांच्याप्रमाणेच ही जोडी बॉलिवूडकरांसाठी रिसेप्शन होस्ट करतील. यावेळी वडिलांचे काही पाहुणेही सोशल मिडियावर हजेरी लावणार आहेत. अर्थातच बॉलिवूडच्या या हिरो नं 1च्या लग्नाला त्याचे चाहते उत्सुक असतील यात शंका नाही.

Recommended

Loading...
Share