Exclusive: शुटिंगच्या दगदगीमुळे आलिया भटला व्हावं लागलं हॉस्पिटलमध्ये भर्ती

By  
on  

आलियाच्या हातात अनेक मोठे प्रोजेक्टस आहेत. आलिया बॅक टू बॅक शुटिंग करताना दिसते आहे. पिपींगमूनला मिळालेल्या माहितीनुसार 2021च्या सुरुवातीला आलिया हैद्राबादमध्ये राजामौलीच्या ‘आरआरआर’ चं शुटिंग करत होती.  आता ती संजयलीला भन्साळींच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ च्या शुटिंगमध्ये व्यस्त होती. पण यादरम्यान अतिताणाने ती आजारी पडली आहे.

 

तिला 17 जानेवारीला सर एचएन रिलायंस फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये भर्ती करावं लागलं. हॉस्पिटमध्ये एक दिवसाची विश्रांती घेऊन आलिया पुन्हा एकदा गंगूबाई काठियावाडी’च्या सेटवर हजर झाल्याचं समजत आहे. आलियाचं सध्याचं शेड्युल पाहता ती नखशिखान्त कामात बुडाल्याचं दिसत आहे.

Recommended

Loading...
Share