PeepingMoon Exclusive: तिग्मांशू धुलिया दिग्दर्शित आगामी सिरीजमध्ये झळकतोय स्कॅम 1992 फेम प्रतिक गांधी

By  
on  

'द स्कॅम 1992- द हर्षद मेहता स्टोरी' या वेबसिरीजमुळे प्रतिक गांधी हा अभिनेता यशोशिखरावर पोहचला. या वेबसिरीजमुळे त्याला अमाप लोकप्रियता मिळाली आणि त्याच्या दमदार अभिनयाचं सर्वत्र कौतुकही झालं.   पण या वेबसिरीजनंतर तो आता नेमकं कोणतं प्रोजेक्ट हाती घेणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. 
शेअरब्रोकर हर्षद मेहताची भूमिका हंसल मेहता यांच्या सोनी लीव्हच्या वेबसिरीजमध्ये साकारणारा प्रतिक गांधी हा गुजराती अभिनेता पुन्हा एकदा एका वेबसिरीजमधूनच रसिकांच्या भेटीला येतोय. 

पिपींगमून डॉट कॉमला एक्सक्ल्युझिव्ह मिळालेल्या वृत्तानुसार, पानसिंग तोमर फेम प्रसिध्द दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया यांच्या आगामी वेबसिरीजमध्ये प्रतिक झळकतोय. ही डिस्नी प्लस हॉस्टारची वेबसिरीज असणार आहे. ही एक थ्रिलींग मर्डर मिस्ट्री  असणार आहे.

भारतीय लेखक विकास स्वरुप यांची प्रसिध्द कादंबी सिक्स ससप्केट्स्वर आधारित असेल. पण यातली प्रतिक गांधीची भूमिका अद्याप गुलदस्त्यातच आहे. तसंच या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री रिचा चढ्ढासुध्दा लक्षवेधी भूमिका साकारणार असल्याचं बोललं जात आहे. Criminal Justice आणि Out of Love या दोन शोजनंतर तिग्मांशू यांचं हॉटस्टारबरोबरचं हे तिसरं प्रोजेक्ट आहे. 
 

Recommended

Loading...
Share