Exclusive: दीपिका पदुकोण आणि हृतिकचा आगामी ‘फायटर’ हा सिनेमा ‘बॅंग बॅंग’चा सीक्वेल?

By  
on  

बॉलिवूड स्टार हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर फायटरच्या घोषणेने उत्सुकता वाढली आहे. दीपिका आणि हृतिक ही जोडी पहिल्यांदाच एकत्र झळकण्यासाठी सज्ज आहे. या वर्षाखेरीस या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात होणार आहे. 2022 मध्ये हा सिनेमा गांधी जयंतीचं औचित्य साधत रिलीज होईल. आम्हाला समजलं आहे की हा प्रोजेक्ट सिद्धार्थ आनंद यांच्या 2014 मधील बॅंग बॅंग’चा सीक्वेल आहे. 

ही स्क्रिप्ट सिद्धार्थ यांनी बॅंग बॅंग 2ची स्क्रिप्ट म्हणून लिहिली होती. बॅंग बॅंगच्या यशानंतर ही स्क्रिप्ट बॅंग बॅंग रिलोडेड या नावाने रजिस्टर केली होती. पण हृतिकच्या वेळेअभावी हा सिनेमा बनू शकला नाही. आता सिद्धार्थ स्वत: या सिनेमाची निर्मिती केली आहे.या सिनेमासाठी ह्र्तिकच आनंद यांची पहिली चॉईस होती. हृतिकला एक हाय अ‍ॅक्शन सिनेमाचा विचार आवडला होता.

त्यामुळे त्याने फायटरला त्याने लगेच तयारी दर्शवली. दीपिकानेही हृतिकसोबत काम करण्याची संधी न दवडता लगेच या सिनेमाला होकार दर्शवला आहे.  हृतिक या सिनेमात पहिल्यांदाच वायुसेनेच्या पायलटची भूमिका केली आहे. तर दीपिकाच्या व्यक्तिरेखेबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण दीपिका यात रोमॅंटिक पार्टनरपेक्षा अधिक असणार आहे.

Recommended

Loading...
Share