By  
on  

PeepingMoon Exclusive: आयुष्यमान खुराना राकुलप्रित सिंगसोबत करणार या सिनेमात रोमान्स

बॉलिवूडचा लाडका अभिनेता आयुष्यमान खुराना पुन्हा एकदा एका नव्या नायिकेसोबत पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. अभिषेक कपूरच्या आगामी सिनेमात वाणी कपूरसोबत रोमान्स केल्यानंतर आता आयुष्यमान दाक्षिणात्य सिनेमातील आघाडीच्या अभिनेत्रीसोबत स्क्रीन शेअर करतोय. पिपींगमूनला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार जंगली पिक्चर्स या निर्मिती संस्थेने त्यांचा आगामी धम्माल कॉमेडी सिनेमा डॉक्टर जी साठी अभिनेता आयुष्यमान खुरानासोबत नायिका म्हणून राकुल प्रित सिंगची निवड केली आहे. 

सुमीत सक्सेना, विशाल वाघ आणि सौरभ भारत लिखित या कॉमेडी सिनेमात राकुल एका  मेडीकल स्टुडंटच्या व्यक्तिरेखेत पाहायला मिळणार आहे. निर्मात्यांनी अद्याप शूटींगचं वेळापत्रक निश्चित केलं नसलं तरी एप्रिलपर्यंत हे प्रोजेक्ट मार्गी लागण्याची शक्यता  आहे. 

बरेली की बर्फी आणि बधाई हो या सुपरहीट सिनेमांनंतर जंगली पिक्चर्सचं हे आयुष्यमानसोबतचं तिसरं प्रोजेक्ट आहे. संपूर्ण डिपार्टमेंटमध्ये आयुष्यमान हा एकटाच स्त्रीरोगतज्ञ असतो. त्याच्याभोवतीच या सिनेमाचं कथानक गुंफण्यात आलं आहे. 

चाहत्यांना आयुष्यमान आणि राकुल प्रित सिंग ही नवी जोडी पडद्यावर पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive