By  
on  

PeepingMoon Exclusive: थिएटर मालकांसोबत चर्चा यशस्वी झाली तर 2 एप्रिलपूर्वी 'सूर्यवंशी' होणार रिलीज, नाहीतर वेब प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

 लॉकडाऊनमुळे अनेक सिनेमांचं प्रदर्शन लांबणीवर पडलं. मोठे सिनेमे असो किंवा छोटे सर्वांनाच याचा फटका बसला. यापैकीच एक मोठा फटका बसला तो रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी या बिग बजेट एक्शनपटाला. हा सिनेमा रिलीजच्या तोंडावर असतानाच लॉकडाऊन जाहीर झालं होतं. आता या सिनेमाबाबत अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत. 14 मेला ईदच्या दिवशी नाही तर  सूर्यवंशी येत्या  एप्रिलपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. पिपींगमूनकडे एक्सक्ल्युझिव्हरित्या सूर्यवंशीच्या प्रदर्शनाबाबतची माहिती आहे. 

बहुचर्चित सूर्यवंशीचे निर्माते रोहित शेट्टी पिक्चर्स, धर्मा प्रोडक्शन, केप ऑफ गुड फिल्म्स आणि रिलायन्स एन्टरटेन्मेन्ट हे थिएटर्स मालकांशी सतत थिएटर्स सुरळीत होण्याबाबत सतत चर्चा करतायत.  जर त्यांची ही चर्चा सुफळ ठरली तर हा सिनेमा कदाचित 2 एप्रिलपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. पण जर ही चर्चा निष्फळ ठरली तर हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला तर तुम्ही आश्चर्य न केलेलंच बरं. 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive