.jpg)
अजय देवगण आणि संजय लीला भन्साळी पुन्हा एकदा गंगूबाई काठियावाडी सिनेमासाठी एकत्र येत आहेत. अजय या सिनेमात कॅमिओ करणार आहे. अजय या महिनाखेरीस शुटिंगला सुरुवात करेल. अजय यात करीम लालाच्या व्यक्तिरेखेत दिसतो आहे. करीम लाला मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातील मातब्बर नाव होतं.
करीम लालाचा एका माणूस गंगूबाईवर बलात्कार करतो. न्याय मागण्यासाठी गेलेली गंगूबाई करीम लालाला भाऊ मानते. हुसेन जैदी यांच्या 'माफीया क्वीन्स ऑफ मुंबई' तीला एका प्रकरणामध्ये गंगुबाई कोठेवालीचा उल्लेख आहे. 'गंगुबाई' ही मुंबईतील रेड लाईट एरिया कामाठीपुरामध्ये 'मॅडम' म्हणुन ओळखली जायची. आपल्या पोस्टरमुळे ती प्रचंड लोकप्रिय झाली होती. कुख्यात गँगस्टर सुद्धा गंगुबाईच्या संपर्कात होते.