Exclusive: जॅकलीन फर्नांडिस बनली ‘रामसेतू’ साठी अक्षय कुमारची नायिका

By  
on  

अक्षय कुमार या लॉकडाऊननंतर अनेक सिनेमे हातात घेताना दिसतो आहे. त्यापैकीच एक सिनेमा आहे रामसेतू. या सिनेमाला आता नायिका मिळाली आहे. ‘रामसेतू’ साठी अक्षय कुमारची नायिका बनणार आहे जॅकलीन फर्नांडिस. जॅकलीन सध्या अक्षय कुमारसोबत बच्चन पांडेचं शुटिंग करते  आहे. यापुर्वी ही जोडी ब्रदर आणि हाऊसफुलमध्ये एकत्र दिसली होती. रामसेतूबाबत अजून अधिक माहिती मिळू शकली नाही.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

 

यापुर्वी त्याने केवळ पोस्टर शेअर केलं होतं. “पूल बांधून (सेतु) भारतीयांच्या देहभानात रामाचे आदर्श आपण जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करुया जे पिढ्यांना जोडुन ठेवेल.” पोस्टरमध्ये मागे देव राम एक धनुष्य आणि बाण घेऊन आहेत. जिथे लिहीलय की, “सत्य की कल्पना ?” असं या पोस्टरवर लिहिलं होतं. विक्रम मल्होत्राच्या अबुडांडिया एन्टरटेन्मेंट आणि अक्षयचं केप ऑफ गुड फिल्म्स ‘राम सेतु’ या सिनेमाची निर्मिती करत आहेत. अभिषेक शर्मा याचं दिग्दर्शन करतील.

Recommended

Loading...
Share