Peeping Moon Exclusive : जर मल्टिप्लेक्स मालकांसोबत बोलणी यशस्वी झाली नाही तर सिंगल स्क्रीन व ओटीटीवर रिलीज होणार सूर्यवंशी

By  
on  

सूर्यवंशी या मल्टिस्टारर सिनेमाबाबतची एक खळबळजनक बातमी  पिपींगमूनच्या हाती आली आहे.  2020- 21 चा हा मोस्ट-अवेटेड सिनेमा मल्टिप्लेक्स नाही तर सिंगल स्क्रिनवर आणि ओचटीटीवर  प्रदर्शित होतोय. तसंच येत्या २ एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. 

 लॉकडाऊनमुळे अनेक सिनेमांचं प्रदर्शन लांबणीवर पडलं. मोठे सिनेमे असो किंवा छोटे सर्वांनाच याचा फटका बसला. यापैकीच एक मोठा फटका बसला तो रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी या बिग बजेट एक्शनपटाला. हा सिनेमा रिलीजच्या तोंडावर असतानाच लॉकडाऊन जाहीर झालं होतं. आता या सिनेमाच्या प्रदर्शनाबाबत अनेक समस्या निर्माण होतायत. 

 

सूर्यवंशीचे निर्माते रोहित शेट्टी पिक्चर्स, धर्मा प्रोडक्शन, केप ऑफ गुड फिल्म्स आणि रिलायन्स एन्टरटेन्मेन्ट हे थिएटर्स मालकांशी सतत थिएटर्स सुरळीत होण्याबाबत चर्चा करतायत.  जर त्यांची ही चर्चा सुफळ ठरली तर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सिंगल स्क्रीनवर प्रदर्शित होईल. 

Recommended

Loading...
Share