Peepingmoon Exclusive: अक्षय कुमारच्या ‘राम सेतू’मध्ये जॅकलीन फर्नांडिसचा स्पेशल अपिअरन्स

By  
on  

जॅकलीन फर्नांडिस रामसेतू’ मध्ये अक्षय कुमारसोबत दिसणार असल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. यापुर्वी ही जोडी ब्रदर आणि हाऊसफुलमध्ये एकत्र दिसली होती. जॅकलीनने सध्या अक्षय कुमारसोबत बच्चन पांडेचं शुटिंग संपवलं आहे. जॅकलीन आणि अक्षय सहाव्यांदा एकत्र दिसणार आहेत . 'द ज़ोया फैक्टर', 'परमाणु', 'तेरे बिन लादेन'  या सिनेमासाठी ओळखले जाणारे अभिषेक शर्मा या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.

 

जॅकलीनचा या सिनेमात स्पेशल अपिअरन्स असल्याचं बोललं जात आहे.  या सिनेमाचं पोस्टर अक्षयने हटके अंदाजात केलं होतं. पोस्टरमध्ये मागे देव राम एक धनुष्य आणि बाण घेऊन आहेत. जिथे लिहीलय की, “सत्य की कल्पना ?” असं या पोस्टरवर लिहिलं होतं. विक्रम मल्होत्राच्या अबुडांडिया एन्टरटेन्मेंट आणि अक्षयचं केप ऑफ गुड फिल्म्स ‘राम सेतु’ या सिनेमाची निर्मिती करत आहेत.

Recommended

Loading...
Share