Exclusive: ‘गंगुबाई काठियावाडी’नंतर संजय लीला भन्साळी इन्शाअल्लाह की बैजू बावरा यापैकी कशावर करणार काम?

By  
on  

संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ विरोधात मुंबई सिव्हिल कोर्टात केस दाखल केली गेली आहे. यामध्ये आलिया भट, संजय लीला भन्साळी आणि लेखकाविरोधात कोर्टाने समन्सही बजावलं आहे. पण या सगळ्या धामधुमीतही SLB आपल्या आगामी प्रोजेक्टवर लक्ष ठेवून आहेत. संजय त्यांच्या आगामी इन्शाअल्लाहवर लक्ष केंद्रित करणार असल्याचं समोर येत आहे. काही दिवसांपुर्वी संजय लीला भन्साळी यांनी ‘इन्शाअल्लाह’ हा प्रोजेक्ट होल्डवर ठेवत असल्याचं समोर आलं होतं. 

सलमानसोबत या सिनेमाची बोलणी फिस्कटल्याने सिनेमा होल्डवर गेला होता. पण आता संजय हा प्रोजेक्ट पुन्हा सुरु करत असल्याचं समोर आलं आहे. या सिनेमासाठी 50 पेक्षा जास्त वयाचा अभिनेता आलियासोबत असण्याची अट संजय यांची होती. त्यामुळे या सिनेमासाठी त्यांनी शाहरुखला अ‍ॅप्रोच केल्याचं समजत आहे. त्यानंतर ते बैजू बावरा हा सिनेमा हातात घेणार आहेत. हा सिनेमा संजय लीला भन्साळी यांचा ड्रीमप्रोजेक्ट असल्याचं बोललं जात आहे. खुप दिवसापासून ते या सिनेमाच्या तयारीत आहेत. मुळ बैजू बावरा सिनेमा 1952 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

Recommended

Loading...
Share