Exclusive: विकी कौशलचा Sci-fi सिनेमा ‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा’मध्ये सारा अली खानची वर्णी

By  
on  

सारा अली खानच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी समोर येते आहे. ‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा’मध्ये झळकणार आहे. पीपिंगमूनला एक्सक्लुसिव्हली ही बातमी हाती लागली आहे. ‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा’मध्ये सारा अली खानचा अ‍ॅक्शनपॅक्ड अंदाज दिसणार आहे. 

विकीने जानेवारीमध्ये या सिनेमाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. विकी या सिनेमासाठी जोरदार तयारी करताना दिसतो आहे. त्याने मार्शल आर्ट, तिरंदाजी हे शिकत आहे. आतापर्यंत विकीने दोन पोस्टर शेअर केलं आहे. आदित्य धर पुन्हा एकदा हा सिनेमा दिग्दर्शित करत आहे. आदित्य ब-याच दिवसांपासून या कथेवर काम करत आहे. अश्वत्थामा पांडव आणि कौरवांचे गुरु द्रोणाचार्य यांचा मुलगा आणि आठ चिरंजीवांपैकी एक आहे. या सिनेमाच्या निमित्ताने रॉनी स्क्रूवाला, विकी कौशल आणि आदित्य धर हे त्रिकुट पुन्हा एकत्र येणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने सारा आणि विकी पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत.

Recommended

Loading...
Share