Exclusive : NCB ला सतावत आहे ड्रग्ज प्रकरणातील संशयित अर्जुन रामपाल देशाबाहेर पळून जाण्याची भिती

By  
on  

अमली पदार्थ विरोधी विभाग ज्यांनी बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणाविरोधात 50,000 पानांची चार्जशीट दाखल केली आहे. आता NCB ला ही भिती सतावत आहे की या प्रकरणातील संशयित अर्जुन रामपाल देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता आहे. 
यावर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दक्षिण आफिक्रेच्या दुतावास विभागाला त्यासंबंधीचं पत्रही लिहिलं आहे. 

ड्रग्ज प्रकरणात अर्जुन संशयित असल्याचं NCBचं म्हणणं आहे. यासोबतच त्याची पार्टनर गॅब्रिएला डेमेट्रियड्स चा भाऊ एजिसिलोस यात सहाआरोपी आहे. या चार्जशीटमध्ये 33 नावं आहेत. यात रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सुशांतचा मॅनेजर सॅमुअल मिरांडा आणि नोकर दीपेश सावंत यांचीही नावं आहेत. 

 


 
NCB ला चॅटही मिळालं आहे ज्यात एजिसिलोस अर्जुनला मित्र आणि बॉस या नावाने हाक मारताना दिसतो. याशिवाय मेथ आणि हॅशबाबतही चॅट होत आहे. अर्जुनने बॉस किंवा मित्र असल्याचं नाकारलं आहे. याशिवाय ड्रग्जबाबत त्याचं नाव वापरलं जात असेल तर याची कल्पना नसल्याचंही त्याने सांगितलं आहे.

Recommended

Loading...
Share