PeepingMoon Exclusive: धर्मा प्रोडक्शनने 'दोस्ताना - 2' मधून कार्तिक आर्यनची केली हकालपट्टी

By  
on  

तुम्ही वाचलेली हेडलाईन अगदी खरी आहे. धर्मा प्रोडक्शनच नाही तर करण जोहर आणि त्याच्याशी संबंधित कुठलीच फिल्म कंपनी यापुढे कार्तिक आर्यनसोबत काम करणार नाही. सूत्रांच्या माहितीनुसार धर्मा प्रोडक्शनने दोस्ताना- २ या आपल्या आगामी सिनेमातून कार्तिक आर्यनची हकालपट्टी केली आहे. तसंच भविष्यात त्याच्यासोबत पुन्हा कधीच ही निर्मितीसंस्था काम करणार नाही, असं समजतंय. 

असं पहिल्यांंदाच होतंय की, एखाद्या प्रोडक्शन हाऊसने शुटींग सुरु असतानाच एवढा मोठा निर्णय घेतलाय. सूत्रांच्या माहितीनुसार धर्मा प्रोडक्शन कार्तिकच्या अनफ्रोफेशन वागण्याला प्रचंड वैतागलं आणि त्यांनी हा निर्णय घेतला. इतकच नाही तर या प्रोडक्शन हाऊनसने भविष्याच कार्तिकसोबत पुन्हा काम न करण्याची जणू शप्पथच घेतलीय. 

इथे मुद्दा फक्त कार्तिकच्या डेट्सचा नव्हता तर कार्तिक सिनेमाच्या सेकंड भागातील क्रिएटिव्ह मुद्द्यांवरुन धर्मा प्रोडक्शनसोबत सतत वाद घालायचा. 

Recommended

Loading...
Share